Just another WordPress site

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

 मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार केल्यानंतर ही कारवाई पोलिसांनी केली आहे.कुंदन चौहान असे आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा आहे.कुंदन चौहान हा डोंबिवली येथे त्याच्या भावाकडे आला होता.त्याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला त्यानंतर पीडित मुलीच्या आईने यासंबंधी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या तक्रारीनंतर पोलिसांनी कुंदन चव्हाणला अटक केली आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक आशा निकम यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,डोंबिवली पूर्व भागातील आपल्या नातेवाईकांकडे पाच दिवसांचा पाहुणा म्हणून आलेल्या कुंदन चौहान वय २२ वर्षे या तरुणाने त्याच्या शेजारी राहत असलेल्या एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील चाळे केले.रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांकडून तक्रार दाखल होताच पोलिसांनी तरुणाला अटक करण्यात आली.अटक तरुणाचे नाव कुंदन चौहान वय २२ वर्षे असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा रहिवासी आहे.दोन दिवसापूर्वी कुंदन डोंबिवलीतील आपल्या भावाच्या घरी पाच दिवसांचा पाहुणा म्हणून आला होता.सदरहू त्याच्या घराच्या शेजारी पीडित मुलगी आपल्या आईसह राहते.आरोपी कुंदन चौहान याने अल्पवयीन मुलीची छेड काढण्यास सुरुवात केली असता सोमवारी मुलीची आई शेजाऱ्यांकडे गेली होती या संधीचा फायदा घेऊन आरोपी कुंदन चौहान याने पाठीमागून दोन्ही मुलांना येण्यास सांगितले.बहीण,भाऊ रस्त्याने जात असताना भावाला शिवीगाळ करुन कुंदनने मुलीला आपल्या घरात घेऊन तिच्या बरोबर अश्लील चाळे केले.सदर घडलेल्या प्रकाराने पीडित मुलगी घाबरली होती.पीडित बालिकेच्या आईने कुंदनच्या घराचा बंद दरवाजा उघडला तेव्हा पीडितेने रडत घडलेला प्रकार सांगितला.पीडितेच्या कुटुंबीयांनी तात्काळ रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी कुंदन चौहान याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.