Just another WordPress site

नितीशकुमार उद्या ११ मे रोजी मुंबई दौऱ्यावर; शरद पवार व उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- 

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त) चे नेते नितीश कुमार हे उद्या दि.११ मे गुरुवार रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत.या भेटीत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार कपिल पाटील यांनी दिली आहे.नितीश कुमार यांच्याबरोबर विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर व मंत्री संजय कुमार झा हे उपस्थित राहणार आहे.

विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी नितीश कुमार देशभर नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून यादरम्यान नितीश कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी,बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली आहे.या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार यांना ‘मातोश्री’वर स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे त्यानंतर नितीश कुमार हे ‘सिल्व्हर ओक’वर शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत अशी माहिती जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार कपिल पाटील यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.