यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील आयशानगर परिसरात राहणाऱ्या एका तरूणास बेशुद्ध करून त्याच्याकडील चारचाकी वाहन घेवुन पसार होणाऱ्या एक महिला व पुरूषाची माहिती समोर आली असुन “बरे करा आणि चावडी चढा” या घटनेची संपूर्ण शहरात एकच चर्चा होत आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी की,आसीफ नुरमोहम्मद पटेल वय २९ वर्ष राहणार आयशानगर यावल हा तरूण वाहन चालक असुन तो दि.२१ मे २३ रोजी रात्री मुंबईहुन यावलकडे त्याच्या ताब्यातील चारचाकी स्विफ्ट डीझायर वाहन क्रमांक एमएम १९बीयु ६५८५ या वाहनाने रात्री येत असता कसारा गावापासुन पती,पत्नी यांनी वाहनास थांबविले व जाण्याचे सांगीतले त्यावर रात्रीची वेळ आहे महिला सोबत आहे हा विचार करून वाहनचालक आसीफ पटेल यांने दोघांना आपल्या गाडीत बसविले.दरम्यान मालेगावजवळ आले असता दोघ पती पत्नीच्या आग्रहा खातर जेवणासाठी एका हॉटेलवर थांबले व जेवण झाल्यावर गाडी पुढील प्रवासासाठी निघाली असता त्या दोघ पती पत्नी म्हणाऱ्यांनी आसीफ पटेल यास बेशुद्ध अवस्थेत शिरपुर पलासनेर जवळ फेकुन वाहन घेवुन पोबारा केला.गाडी घेवुन पोबारा करणाऱ्या त्या दोघांना पोलीसांनी नाशिक टोल नाक्यावर वाहनाची कागदपत्र मागितले असता त्याच्या उडवाउडवीच्या उत्तराने पोलिसांनी ताब्यात घेतल्याने घटनेची सविस्तर माहीती समोर आली आहे.दरम्यान आसीफ पटेल हा वाहनाचालक काही तासाने शुद्धीवर आल्याने काही काळ पायदळ व काही अंतर विनंती करुन वाहनाने प्रवास करीत अखेर घरी पहोचला असुन पोलीसाकडून अद्याप त्याच्याकडून जाबजबाब घेण्यात आल्यावर या घटनेची अधिक माहीती मिळु शकेल अशी चर्चा शहरवासियांमध्ये चर्चिली जात आहे.