Just another WordPress site

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस व जमिनीतील ओल बघूनच पेरण्या कराव्यात-राज्यशासनाचा सल्ला

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

यंदाच्या पावसावर एल-निनोचा प्रभाव जाणवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून पाऊस विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे. यातूनच शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस व जमिनीतील ओल बघूनच पेरण्या कराव्यात परिणामी उगाचच पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.याशिवाय शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांच्या विरोधात कारवाईचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच पार पडली.राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा असून सरकारने खरीप हंगामाची पूर्वतयारी केली आहे.शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची मदत,पीक विमा कर्ज यासाठी बँकांना सूचना केल्या आहेत. शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्जाचा पुरवठा करावा.बँकांनी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी यावेळी बँकांना केली आहे.कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँकांच्या विरोधात सरळ गुन्हे दाखल करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिला.पीक कर्ज वितरणाला गती द्यावी.जिल्हा प्रशासानने पीक कर्ज वितरणाचा नियमितपणे आढावा घ्यावा अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली.बनावट  बियाणे,खते विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई करावी.वेळप्रसंगी त्यांचे परवाने रद्द करावेत.आगामी काळात पिकांचे पंचनामे करताना मानवी हस्तक्षेप टाळून तो ई-पीक पाहणीच्या माध्यमातूनच झाला पाहिजे असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.