यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील आसेमं ऑनलाईन सर्व्हिस सेंटरला आदिवासी विकास महामंडळाचे अप्पर सहाय्यक आयुक्त संदीप गोलाईत नाशिक यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन आसेमं ऑनलाईन सर्व्हिस सेंटरच्या कार्याचे त्यांच्याकडून कौतुक करण्यात आले.
प्रसंगी महानायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अप्पर सहाय्यक आयुक्त संदीप गोलाईत नाशिक यांच्या शुभहस्ते उद्दघाटन करण्यात आले.यावेळी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे,सहाय्य्क प्रकल्प अधिकारी माहुरे साहेब,जावेद तडवी,बबलु तडवी,पवन पाटील,”आसेमं”चे पदाधिकारी अनिल नजीर तडवी,डॉ.लुकमान तडवी,ठाकूर दादा,कवी बि.राज तडवी,मुराद जुम्मा तडवी,यासिन तडवी, अतुल पटेल,अल्ताफ पटेल हे उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी संदीप गोलाईत व विनीता सोनवणे यांनी आदिवासी योजनांच्या बाबतीत मार्गदर्शन केले व कमीत कमी खर्चामध्ये ऑनलाईन सेंटर सुरु केले त्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले.