यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील डोंगरकठोरा येथे शेतात म्हशी चारल्याच्या कारणावरून एका तरुणास बखीने बेदम मारहाण केल्याने त्यास गंभीर दुखापत
झाली असुन यावल पोलिस ठाण्यात या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील डोंगरकठोरा येथे आज दि.२६ मे शुक्रवार रोजी सकाळी १o वाजेच्या सुमारास राजेन्द ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेताजवळ सार्वजनिक ठीकाणी गावातील चंद्रकांत बळीराम सपकाळे यास पितांबर केशव आढाळे यांच्या शेतातील पत्ती व पिल म्हशीला चारल्याच्या कारणावरून पितांबर आढाळे यांने चंद्रकांत सपकाळे यास शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याच्या हातातील बखीने मारहाण करीत जांगेत गंभीर दुखापत केली.दरम्यान चंद्रकांत सपकाळे यास जखमी अवस्थेत उपचारासाठी तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित तडवी यांनी जखमींवर प्रथम उपचार केले.यावेळी चंद्रकांत सपकाळे याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी जळगावच्या सामान्य रुग्णालयात
पाठविण्यात आले आहे.याबाबत सुंनदाबाई बळीराम सपकाळे यांनी फिर्याद दाखल केल्याने पितांबर आढाळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे हे करीत
आहे.