Just another WordPress site

हिंगोणा येथील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

तालुक्यातील हिंगोणा गावा जवळील मोरधरण परिसरात एका महिलेचा गेल्या महिन्यापूर्वी खून झाल्याची घटना घडली होती.याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवून संशयित आरोपीला शोधण्यात यश मिळविले असून त्यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहीती अशी की,या घटनेतील संशयीत आरोपी खुमसिंग सरदार बारेला वय ३३ वर्ष मुळ राहणार खिरवड तालुका रावेर हल्ली मुकाम मोर धरणाजवळ हिंगोणा याच्याकडे एक ४० वर्षीय महिला हिने खुमसिंग याच्या सोबत राहण्याचा हट्ट केला मात्र
संशयीतने सदर महिलेस सांगीतले की तुझ्यामुळे माझा संसार खराब होइल असे तिला वारंवार बोलुन समजवण्याचा प्रयत्न केला मात्र सदरची महीला ही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने संशयीत आरोपी सुमसिंग सरदार बारेला याने दि.२८ एप्रिल २३ रोजी संतापाच्या भरात त्याच्याकडील असलेल्या ब्लेडने त्या अज्ञात महिलेच्या गळ्यावर वार करून नंतर तिला विहीरीत ढकलुन दिले होते.याबाबत सदर महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवून आरोपीला जेरबंद केले आहे.याबाबत संशयीत आरोपीच्या विरूद्ध फैजपुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.सदरहू या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.मात्र या घटनेतील खुन झालेल्या अज्ञात ४० वर्षीय महीलेची अद्याप पर्यंत ओळख पटलेली नसून पोलिसांच्या वतीने सदर महिलेची ओळख पटविण्याचा दिशेने पुढील तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.