Just another WordPress site

दहिगावसह तालुक्यातील अवैद्यधंदे कायमचे बंद करण्याची कुटुंबत्रस्त महीलांची मागणी

 गावातील सरपंच व ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावास संबंधित प्रशासनाकडून केराची टोपली

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-

तालुक्यातील दहिगाव गाव बनले अवैद्यधंद्यांचे माहेरघर!  उक्तीनुसार गेल्या अनेक दिवसापासुन येथे दारू,जुगार,मटका या अवैध धंद्यानी परिसरात चांगलाच धुमाकुळ घातला आहे.यात अवैद्य धंदे व्यवसायीकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अनेकांचे संसार उघडयावर पडून उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे.सदरील सावळ्या गोंधळामुळे गावाची शांतता व कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी प्रशासनाने त्वरीत या अवैद्यधंद्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कुटुंबत्रस्त महीलांनी केली आहे.

तालुक्यातील दहिगाव गावासह परिसरात मोठया प्रमाणावर सार्वजनिक ठिकाणी खुलेआम हातभट्टीची गावटी दारू व घातक साहित्याने तयार केलेली पन्नीची दारू विक्री केली जात आहे तसेच गावातील मुख्य चौकात विद्यालयासमोर पान टपऱ्यांवर मटका एजंट संकलन करण्यात येत आहे.खुलेआम अवैद्य धंद्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जिवनावर देखील या मटका व अवैध दारू विक्रीचा परिणाम होतांना दिसून येत आहे. याशिवाय सहजपानटपऱ्यांवर गल्ली बोळातील सार्वजनिक ठीकाणी मिळणाऱ्या या दारूमुळे अनेक अल्पवयीन मुले व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे तरुण मजुर व्यसनाधिनतेकडे वळत असुन अनेकांचे आयुष्य व कुटुंबाचे संसार उद्धवस्थ होण्याच्या मार्गावर आहे.दारूच्या व्यसनामुळे अनेक तरुणांचे मृत्यु देखील झालेले आहेत हे विशेष ! तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेऊन तालुक्यातील अवैद्यधंदे तात्काळ कायमची बंद करण्यात यावे अशी मागणी तालुकावासीयांकडून करण्यात येत आहे.यात दहिगाव गावाचे सरपंच अजय अडकमोल यांनी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांकडे याबाबत आपल्या व्यथा मांडल्या असून सरपंच अजय अडकमोल यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातुन दारूबंदीचा ठराव घेत तसे निवेदन देखील प्रशासनास दिलेले आहे मात्र याचा काहीही एक उपयोग झाला नसून सरपंच यांच्या निवेदनाला संबंधित प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे.त्यामुळे संपूर्ण तालुक्यात अवैध धंदे जोमात सुरू असल्याने सदरील अवैद्य धंदे तात्काळ बंद करण्यात यावी अशी आग्रही मागणी तालुकवीयांकडून करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.