जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-राज्यभरात शिवसेनेच्या शिंदे गटाची जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे.नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुख पदी अनिल ढिकले व ग्रामीण जिल्हाप्रमुख पदी भाऊलाल तांबडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे.दुसरीकडे शिंदे यांनी महाराष्ट्र दौऱ्यालाही सुरुवात केली आहे.काही दिवसांपूर्वी पैठण(औरंगाबाद)येथे एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली.या सभेतून शिंदे गटाने मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केले.आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच मुक्ताईनगर येथे आज दि.२० सप्टेंबर रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या जाहीर सभेत मुख्यमंत्री कोणावर निशाणा साधणार?याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून प्रथमच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.आज मुक्ताईनगर येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होत आहे.त्यामुळे एकनाथराव खडसे यांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे कोणावर निशाणा साधणार याकडे महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा खिळल्या आहे.दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाच्या माध्यमातून हिंदू गर्व गर्जना यात्रेची घोषणा करण्यात आली आहे.हि यात्रा २० सप्टेंबर २२ ते ३० सप्टेंबर २२ या कालावधीत निघणार असून यात्रेची सुरुवात २० सप्टेंबर २२ रोजी सकाळी ११ वाजता स्वराज्य सांस्कृतिक भवन कोरेगाव रोड सातारा येथून करण्यात येणार आहे.