Just another WordPress site

टोकरे कोळी प्रमाणपत्र देण्याबाबत महासंघाचे आदीवासीमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांच्याकडे मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीला जातीचे (एसटी) प्रमाणपत्र देतांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गांना जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नियमावली निश्चित केलेली आहे याच नियमाच्या तरतुदीप्रमाणे महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार,धुळे,नाशिक व नगर जिल्ह्यामध्ये आदिवासी टोकरे कोळी,कोळी महादेव व इतर जमातींना जातीचे (एसटी) प्रमाणपत्र देतांना त्यांच्या शैक्षणिक व महसुली अभिलेखात कोळी म्हणून नोंद असले तरी त्यांना टोकरे कोळी,कोळी महादेव म्हणून जातीचे प्रमाणपत्र महसूल विभागाचे काही उपविभागीय अधिकारी हे देत असून उर्वरित जळगावसह अन्य जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येने आदिवासी टोकरे कोळी, कोळी महादेव जमातीचे लोक वास्तव्याला असताना यांच्या १९५० च्या शैक्षणिक व महसुली नोंदी कोळी असल्याचे कारणाने त्यांना टोकरे कोळी,कोळी महादेव जमातीचे जातीचे प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यात येत असल्याने उर्वरित महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीच्या लोकांना संविधानात्मक प्राप्त आरक्षण व शासकीय योजनाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे हा एक प्रकारे अन्यायच आहे तसेच टोकरे कोळी,कोळी महादेव जमातीचे जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी उपविभागीय अधिकारी हे आपल्या अधिकार पदाचा दुरुपयोग करून पक्षपातीपणाची भूमिका घेत आहे.याबाबत आदिवासी विकास विभागाकडून अडथळे निर्माण करून आदिवासी कोळी जमातीचे लोक जात प्रमाणपत्र पासून वंचित राहत आहेत त्याअनुषंगाने दि.२८ मे रोजी अजिंठा शासकीय विश्राम गृह जळगाव येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री ,ना.डॉ विजयकुमार गावीत यांची भेट घेऊन या अन्यायकारक विषयांतर सविस्तर चर्चा करण्यात आली.

भेटी प्रसंगी जळगाव शहर आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे,भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ सुर्यवंशी, सरचिटणीस महेश जोशी,नितीन इंगळे भाजपा वाहतुक आघाडी अध्यक्ष प्रमोद वाणी यांच्या उपस्थितीत प्रल्हाद सोनवणे आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव जिल्हा महानगर यांनी राजेन्द्र कोळी,गोकुल सपकाळे,योगेश्वर कोळी,संभाजी शेवरे,जितेन्द्र कोळी,युवराज सपकाळे या पदाधिकारींसह भेट घेतली.प्रल्हाद सोनवणे यांनी
आदिवासी टोकरे कोळी जमातीवरील होत असलेला पक्षपातीपणा व अन्याय याबाबतची सर्व माहिती चर्चे द्वारे दिली.यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी लवकरच या विषयाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे
शिष्टमंडळास आश्वासित केले.

यासाठी आदिवासी कोळी महासंघावतीने संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे यांच्या मार्गदर्शनाने प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे,राज्य संघटक प्रशांत तराळे व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांच्या नेतूत्वात सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते व समाज बांधव जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये मोर्चे आंदोलने,उपोषणे,अन्नत्याग सत्याग्रह करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आदिवासी कोळी महासंघाच्या वतीने प्रत्येक जिल्हयातील जिल्हाधिकारी यांना मुद्देसुर पुरावेही सादर करण्यात आले आहेत.आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीचे राज्यव्यापी उपोषण आयोजित करण्यात आले त्याची दखल आपल्या राज्य सरकारने घेतली व उपोषण ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी म्हणून पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील व सहकार मंत्री नामदार अतुल सावे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन समाज व्यवस्थेतील या आदिवासी कोळी जमातीतील लोकांना सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळवून देऊन त्यांना समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगीतले.राज्यातील काही जिल्हे मधुकरराव पिचडप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील तमाम आदिवासी टोकरे कोळी,कोळी महादेव जमातीला सुलभतेने प्रमाणपत्र देण्यात यावे व या संदर्भाने मंत्रालय स्तरावर आपल्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे यांच्या उपस्थितीत आदिवासी कोळी महासंघाचे राज्यातील नेते,पदाधिकारी व या विषयाशी संबंधित आदिवासी विकास विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.