बीड जिल्ह्यातील चिंचोलीमाळी (ता.केज) येथील रोहन गलांडे पाटील या शेतकरीपुत्राने चक्क गौतमी पाटील हिला पत्र पाठवून लग्नाची गळ घातली आहे.रोहन गलांडे याने पत्रात म्हटले आहे की,गौतमी पाटील ‘तू भारी तुझ्या घरी,पण तु होती का माझी परी?’मी रोहन गलांडे पाटील तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे.मुलाखतीत कसा जोडीदार हवाय हे सांगताना गौतमी पाटील म्हणाली होती,आता मी २५ वर्षांची आहे. लग्न करून घरसंसार थाटावा अशी माझी इच्छा आहे.फक्त मला इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे.मान,सन्मान,प्रसिद्धी,पैसा नको,फक्त त्याने कोणत्याही परिस्थितीत मला साथ द्यायला हवी.मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकले,मला भाऊ नाही त्यामुळे पुरुष मंडळीशी माझा संबंध कधीच आला नाही.माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा अशी माझी मनापासून इच्छा असल्याने लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे असे गौतमीने मुलाखतीत सांगितले होते.त्याच मुलाखतीचा संदर्भ देत रोहन गलांडे पाटील याने गौतमीच्या संसाराचा भार उचलण्याची तयारी दर्शविली आहे म्हणूनच पत्रात म्हटले आहे की,तुझ्या सर्व इच्छा-अटी मला मान्य आहेत.तू जशी आहेस तशीच मला आवडली आहे.
तुझ्यासोबत कोणी लग्नाला तयार नसले तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.एवढेच नव्हे तर राहुल गलांडे पाटील याने वैयक्तिक माहिती देताना,माझे वय २६ वर्ष आहे.मी एक शेतकरीपुत्र असून बागायती शेती आहे.दूध व्यवसायदेखील आहे.तू माझ्याशी लग्नाला तयार असशील तर मला भेटायला ये अशी हाक रोहन गलांडे पाटील यांनी गौतमीला दिली असून घरचा पत्तादेखील दिला आहे. दरम्यान राज्यभर चर्चेत असलेल्या गौतमी पाटीलने व्यक्त केलेली लग्नाची इच्छा आणि तिने सुरू केलेला वराचा शोध पाहता बीड जिल्ह्यातील रोहन गलांडे पाटील याने थेट तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवल्याने दोघेही चर्चेत आले आहेत.