Just another WordPress site

कुस्तीगीर महिला खेळाडूंच्या आंदोलनावरून भाजप खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांचा घरचा आहेर

बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा) :-
खासदारच नव्हे तर एक महिला म्हणून त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. त्यांनी केलेल्या आरोपावर वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. कुस्तीगीर महिला खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता अशी स्पष्ट भूमिका घेत सरकारकडून कुस्तीगीरांशी संवाद साधायला कोणीच गेले नसल्याची खंत भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी बुधवारी व्यक्त केली.
बीड येथील भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कार्यालयात बुधवार दि.३१ मे रोजी खासदार प्रीतम मुंडे यांनी पत्रकार बैठकीत भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाची माहिती दिली.खासदार मुंडे म्हणाल्या की,केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महाजनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे.या माध्यमातून केंद्राच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या.करोना काळात सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेत जागतिक स्तरावर दखल घ्यावे असे काम केले.उज्ज्वला,मुद्रा अशा योजना प्रभावीपणे राबवल्या.पंतप्रधान ग्रामसडक योजना,राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यातील रस्ते चकाचक झाले आहेत त्यामुळे रोजगार निर्मिती देखील होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान आवास योजनेतून ग्रामीण भागात २० हजारांवर घरे उभारली गेली.विकास कामांबरोबरच ३७० कलम रद्द करणे,तिहेरी तलाक रद्दचा निर्णय स्वागताहार्य होता असेही खासदार मुंडे म्हणाल्या.
यात संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होत असतांना महिला कुस्तीगीरांनी खासदार बृजभुषण पांडे यांच्याविरोधात कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन केले.या विषयी विचारले असता खासदार मुंडे यांनी एक महिला म्हणून निश्‍चितच या गोष्टीचा खेद वाटतो.त्या महिला कुस्तीगीरांचे म्हणणे कोणीतरी ऐकून घ्यायला हवे होते त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता अशी अपेक्षा व्यक्त करत खासदार प्रीतम मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,प्रवक्ते राम कुलकर्णी,प्रा.देवीदास नागरगोजे यांची उपस्थिती होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.