यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील विवाहीत तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच समोर आला असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील विवाहित तरुण जितेंद्र उत्तम तायडे वय ३८ वर्ष याने काल दि.१जून रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील पत्रांच्या शेडला असलेल्या लाकडी दांड्याला रुमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.जितेन्द्र तायडे यांचा छत्राला लटकलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने खाली उतरवुन उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषीत केले.सदरच्या विवाहीत तरूणाने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलेले ते मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात मयताचा लहान भाऊ हेमंत उत्तम तायडे वय ३३ वर्ष यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.