यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील मौजे परसाडे येथे गावाच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच मिना राजू तडवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध विकास कामांचे भुमिपुजन व पुर्णत्वास गेलेल्या विकास कामांचे लोकार्पण कार्यक्रम रावेरच्या खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते आज दि.२ जून २३ शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना अंतर्गत रु.५५ लक्ष,५ हजार लिटरचे पाणी टँकर रू.२.५ लक्ष,तडवी कब्रस्थान संरक्षण भिंत रु.२० लक्ष,हायमास्ट लाईट १० नग रु.१ लक्ष व २० सिमेंट बाक ई. विकास कामांचे “भूमिपूजन व लोकार्पण” करण्यात आले तसेच इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी सादिया अरमान तडवी हीला एनएमएमएस (आर्थिक दुर्बल घटक) परीक्षेत ८८.४७ % गुण मिळाल्याबद्दल व नवनिर्वाचित यावल बाजार समिती सभापती व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश संयोजक किशोर कळकर,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील,कृउबाचे संचालक नारायण चौधरी,तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,कृउबाचे नव निर्वाचित संचालक उज्जैनसिंग राजपूत,डांभुर्णी माजी सरपंच पुरोजित चौधरी,माजी जि.प.सदस्य सविता भालेराव,यावल कृउबाचे संचालक राकेश फेगडे,कृउबा संचालीका कांचन फालक,पंकज चौधरी,विलास पाटील,भाजयुमोर्चाचे सागर कोळी,डॉ.निलेश गडे,उमाकांत पाटील,दिपक पाटील,देविदास पाटील,विमल महाजन,राजू महाजन,वड्री सरपंच अजय भालेराव,लहु पाटील,मोहराळा सरपंच नंदा महाजन,जहांगीर तडवी,ममता तडवी,ग्राम पंचायत सदस्य भरत महाजन,मुबारक तडवी व ग्रामपंचायत सदस्य सलिम तडवी,युनुस तडवी,उपसरपंच सुलेमान तडवी,राजू तडवी,रोशन तडवी,रशीद तडवी,बाबासाहेब भालेराव,शकीला तडवी,मदिना तडवी,खल्लोबाई तडवी,रमजान तडवी,योगिता सावळे यांच्यासह ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.