नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेले एक ट्वीट आढळले असून हे ट्वीट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या फोटोसह शेअर करण्यात आले आहे यात केजरीवाल हे दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंसह दिसत होते.कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे या ट्वीटच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.इतकेच नव्हे तर येत्या काळात सरकारने न्याय न दिल्यास ते देश सोडण्याचा विचार करतील असे देखील त्यात म्हटले आहे या ट्वीटसंदर्भात लाइटहाऊस जर्नालिज्मने केलेल्या तपासात संपूर्ण प्रकरण समोर आले आहे.