Just another WordPress site

यावल बालसंस्कार माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या परिक्षेचा निकाल ९८.५० टक्के

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

येथील शहरातील शैक्षणीक गुणवत्तेत अग्रस्थानी राहणाऱ्या बालसंस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी संचलीत बालसंस्कार माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.५० टक्के लागला असुन यात उर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौत्तुक करण्यात येत आहे. विद्यालयातून दहावीच्या परिक्षेसाठी ६७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होते त्यापैकी ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यात विद्यालयातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.प्रथम क्रमांक-रिया विजय कवडीवाले शे.गुण९४.४०,द्वितीय क्रमांक-रुपाली विजय फालक शे.गुण ९३.४० व द्वितीय क्रमांक-श्रध्दा उमेश यावलकर ९३ ४० तसेच तृतीय क्रमांक-विशाल नारायण चौधरी शे.गुण ९१.२० तृतीय क्रमांक-मेघा संजय पंडित शे.गुण ९१.२ यांनी गुणतालिकेत यश संपादन केले आहे.सर्व दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष महेश वाणी,सर्व संचालक तसेच मुख्याध्यापक अतुल गर्गे,शिक्षक ललित चौधरी,नितीन बारी,सुनिल देशमुख व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व त्यांचे कुटुंबीयांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.