Just another WordPress site

यावल तहसिलदारपदी मोहनमाला नाझीरकर रुजू

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

येथील तहसीलदार महेश पवार यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी आज दि.५ जून २३ सोमवार रोजी सौ.मोहनमाला नाझीरकर या तहसीलदारपदी नव्याने रुजू झाल्या आहेत.

यावल येथे कार्यरत असलेले तहसीलदार महेश पवार यांची जळगाव येथे बदली झाल्याने यावलच्या तहसीलदार म्हणुन पुणे येथे महसुलमधील  जमावबंदी विभागात नायब तहसीलदार म्हणुन कार्यरत असलेल्या सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी प्रथमच तहसीलदारपदाचा आज दि.५ जून रोजी पदभार स्विकारला आहे.प्रशासकीय कार्यात गती व शिस्त लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी म्हटले आहे.यावेळी यावल तहसील कार्यालयाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,निवडणुक विभागाचे रशीद तडवी,पुरवठा विभागाच्या तालुका पुरवठा अधिकारी कु.अंकिता वाघमळे,संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार मनोज थारे,पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन वाय.डी.पाटील,दिपक बाविस्कर यांच्यासह महसुलच्या सर्व विभागातील कर्मचारी यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.