Just another WordPress site

महापुरुषाची मिरवणुक काढल्याप्रकरणी जातीयवाद्यांनी केलेल्या खुनाबद्दल त्यांना फाशीची शिक्षा व्हावी – निळे निशाण संघटनेची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

राज्यातील नांदेड जिल्ह्यात असलेल्या बोंढार या गावात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणुक काढणाऱ्या अक्षय भालेराव तरूणावर जातीवादयांनी अमानुषरित्या धारदार चाकुने हल्ला करून त्याची हत्या केली होती सदरहू या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निळे निशाण या सामाजीक संघटनेच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे निवेदनाव्दारे नुकतीच करण्यात आली आहे.

याबाबत निळे निशाण सामाजीक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे व तालुका अध्यक्ष विलास तायडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील नांदेड जिल्ह्यात असलेल्या बोंढार या गावात राहणारा अक्षय भालेराव या तरूणाने गावात प्रथमच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची १४ एप्रील रोजी भव्य मिरवणुक काढली असता याच गावातील १५ ते २० जातीयवादी समाजकंटकांना हे आवडले नाही व याचा राग मनात ठेवुन या जातियवादी तरुणांनी १ जुन २०२३ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास बोढार गावातील एका ठीकाणी लग्न होते या ठीकाणी काही तरुण डिजेवर नाचन होते यावेळी अक्षय भालेराव हा तरूण जेवण करून फिरत असतांना यापुढे गावात कुणीही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मिरवणुक कुणी काढणार नाही असे म्हणत गावातील १५ ते २० एकाच समाजातील जातीयवादी तरूणांनी मिळुन अक्षय भालेराव या निष्पाप तरूणास बेदम मारहाण करून धारदार चाकुने वार करून त्याचा खून केला आहे सदरील घटना अखिल मानव जातीला काळिमा फासणारी घटना असल्याने या घटनेचा सर्वच थरातून निषेध नोंदविण्यात आला आहे.सदरहू या भ्याड हल्ल्यात अक्षय भालेराव हा तरूण मरण पावला असून या अमानुष हत्येमध्ये सहभागी असलेल्या सर्व जातीयवादी गुंडांना भादवी कलम ३०२ अनुसार फाशीची शिक्षा देण्यात यावी व तसे न झाल्यास निळे निशाण सामाजीक संघटनाच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना दिलेल्या निवेदनावर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे,तालुका उपाध्यक्ष विलास तायडे यांच्यासह लक्ष्मीताई मेढे,सतिष अडकमोल,अनिल इंधाटे,अमोल तायडे,मिलींद सोनवणे,मांगीलाल भिलाला,हिरालाल बारेला,अनारसिंग भिलाला,नान्या बारेला,सायमक बारेला आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.