Just another WordPress site

आईच्या प्रियकराचा मुलांनी खून करून मृतदेह नाशिकहून करमाळ्यात आणून टाकला !

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
करमाळा शहराजवळ अहमदनगर रस्त्यावर थांबलेल्या स्विफ्ट मोटारीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत बेवारस मृतदेह आढळून आल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अवघ्या १६ तासांत गुन्ह्याचे धागेदोरे शोधून दोघा बंधुंना अटक केली आहे.यात आईबरोबर अनैतिक संबंध ठेवल्यामुळे चिडून दोघ भावांनी अन्य एका महिलेसह कट रचून हा खून केल्याचे समोर आले आहे.श्रावण रघुनाथ चव्हाण (वय ३९, रा.अडसुरे,ता.येवला,जि.नाशिक) असे खून झालेल्या पुरूषाचे नाव आहे.याबाबत त्यांचे बंधू संभाजी चव्हाण यांनी करमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार या गुन्ह्यातील संशयित आरोपी सुनील शांताराम घाडगे (वय २८) आणि राहुल शांताराम घाडगे (वय ३०,रा. अंदरसूल,ता.येवला,जि.नाशिक) या बंधुंसह अन्य एका महिलेचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे.सदरहू दोघे घाडगे बंधुंना अटक करण्यात आली असून महिला आरोपीचा शोध घेतला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,आपल्या आईसोबत मृत श्रावण चव्हाण याचे असलेले अनैतिक संबंध उजेडात आल्यामुळे दोघे घाडगे बंधू चिडले होते.याकरिता त्यांनी एका महिलेला सोबत घेऊन श्रावण चव्हाण याच्या खुनाचा डाव रचला.त्याप्रमाणे त्यांनी श्रावण चव्हाण यास गावात बोलावून घेतले नंतर एका महिलेसह घाडगे बंधुंनी मिळून श्रावण चव्हाण याचा खून केला त्यानंतर त्याच्याच स्विफ्ट मोटारीत मृतदेह घालून दूर अंतरावर करमाळा भागात आणून माळरानावर टाकून दिला.यात सदरील मृतदेह मोटारीसह अर्धवट जळाला होता.याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील,करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे आणि सहायक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे यांनी कौशल्याने तपास करून गुन्हा उजेडात आणला आहे.या गुन्ह्यातील तिस-या महिला आरोपीला अटक करायची आहे सदर महिलेचा शोध सुरु आहे.सदरहू या तरुणाचा खून कोणत्या हत्याराने केव्हा आणी कोठे केला? गुन्ह्यात आणखी कोण कोणाचा सहभाग आहे ? मृतदेह आणि मोटार कशी पेटविली ? मृतदेह मोटारीत टाकून कोणत्या मार्गाने आणला याची उकल करावयाची असल्याने या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासायचे आहेत.त्या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.