अकोला आणि संभाजीनगरमधील हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला यापैकी संभाजीनगरमध्ये पोलीस गोळीबारात एकाचा मृत्यू झाला.एवढ्या अल्पकाळात राज्यातील जातीय वातावरण एवढे दुषीत कसे झाले?असा सवाल केला जात आहे.गृह विभाग किंवा गुप्तचर विभागाचे हे अपयशच मानावे लागेल.मुख्यमंत्रीपदी असताना गृह खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते व तेव्हा त्यांनी गृह खाते सक्षमपणे हाताळले होते.सध्या फडणवीस यांच्याकडे असलेले गृह खाते कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरू लागले की काय?असे चित्र निर्माण झाले आहे.कोल्हापूरमध्ये मंगळवारीच बंद आणि मोर्चाची हाक देण्यात आली होती तरीही बुधवारी मोठय़ा प्रमाणावर जमाव जमा झाला पोलिसांनी हा जमाव रोखला का नाही? असाही सवाल विरोधकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
जातीय सलोखा पाळण्याचा राज्याचा इतिहास असला तरी गेल्या अडीच ते तीन महिन्यांत राज्याच्या आठ शहरांमध्ये जातीय तणाव किंवा हिंसाचाराचे प्रकार घडले आहेत यात गृह आणि गुप्तचर विभागाचे हे अपयशच मानावे लागेल.पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक वातावरण तापविले जात अल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.राज्यात मार्च अखेरपासून जातीय तणावाचे प्रकार वाढीस लागले आहेत.रामनवमी उत्सवापासून ते आतापर्यंत संभाजीनगर,मुंबईतील मालाड मालवणी,अकोला नगरमध्ये शेवगाव आणि संगमनेर,जळगावमध्ये जातीय तणाव किंवा हिंसाचाराचे प्रकार घडले आहेत.कोल्हापूरमध्ये लवकरच जातीय दंगल होईल असा इशारा माजी गृहराज्यमंत्री तथा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी दोन आठवड्यांपूर्वी दिला होता परिणामी सतेज पाटील यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली आहे.