Just another WordPress site

राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी ग्रामसेवकास निलंबीत व सरपंचास पदमुक्त करा -निळे निशाण संघटनेची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

तालुक्यातील किनगाव ग्रामपंचायतच्या राष्ट्रीय ध्वजस्तंभाच्या ठीकाणी दुसरे ध्वज फडकावुन राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करण्यात आला असुन याबाबत पंचायत समिती प्रशासनाने येत्या दोन दिवसात सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाही न केल्यास निळे निशाण या सामाजीक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी दिला आहे.या संदर्भात निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने आज दि.८ जून रोजी यावल पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना निवेदन देण्यात आले आहे.

सदरील निवेदनात म्हटले आहे की,किनगाव ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर शासनाने राष्ट्रीय ध्वजाकरीता निर्धारीत केलेल्या ठीकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने जाणीव पुर्वक जातीपातीचे वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याठीकाणी कार्यरत असलेले ग्रामसेवक,सरपंच सदस्य यांनी संगनमताने राष्ट्रीय ध्वजाकरीता शासनाने निर्धारित केलेल्या जागेवर भगव्या रंगाचा ध्वज लाऊन इतर जातीधर्माच्या लोकांच्या भावना भडकावुन सामाजिक सलोखा बिघडवुन जातीधर्मात तेड निर्माण करून राष्ट्रीय ध्वजाच्या जागी भगवा झेंडा लावुन राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केलेला आहे.तरी गटविकास अधिकारी अशा प्रकारे बेजबाबदारीने कार्य करणाऱ्या ग्रामसेवक आणी सरपंच व त्यांचे सहकारी या संबधीतांवर तात्काळ कठोर कारवाई करून संबधीत ग्रामसेवकास तात्काळ निलंबीत व सरपंच यांना पदमुक्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे, तालुका अध्यक्ष विलास तायडे,युवक तालुका अध्यक्ष सतिष अडकमोल,महीला मंच तालुका अध्यक्ष लक्ष्मीबाई मेढे,अनिल इंधाटे,तालुका उपाध्यक्ष अमोल तायडे यांनी केली असून संबधितांवर दोन दिवसात पंचायत समिती प्रशासनाने कारवाई न केल्यास निळे निशाण संघटनेच्या वतीने पंचायत समिती आवारात आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.