Just another WordPress site

“लिव्ह इन पार्टनर हत्याप्रकरणी आरोपीस कठोर शिक्षा व्हावी म्हणून राज्य महिला आयोग पाठपुरावा करणार”

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची माहिती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

मीरा रोडमध्ये मनोज साने नावाच्या एका माणसाने त्याच्या सरस्वती नावाच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली होती त्यानंतर तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करून त्यातील काही तुकडे शिजवले,काही भाजले,काही फेकले असून अत्यंत निर्घृण अशी ही घटना महाराष्ट्रात घडली आहे. संपूर्ण राज्य सदरील घटनेने हादरले आहे.आरोपी मनोज सानेला अटक करण्यात आली असून या घटनेची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली आहे.या घटनेतील आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.मीरा रोड याठिकाणी लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करण्यात आली त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले.पोलिसांना तुकडे केलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.तिच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीनेच तिची हत्या केली.हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना अत्यंत हिंस्र पद्धतीने ती विल्हेवाट लावत होता ही घटना ऐकूनही अंगावर शहारे येतात.राज्य महिला आयोगाने सदर घटनेची गंभीर दखल घेतली आहे.पोलिसांना आता तपास करुन अहवाल सादर करण्याचे निर्देशही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की,कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा केली जाईल.कठोर शिक्षा व्हावी म्हणून राज्य महिला आयोग पाठपुरावाही करणार आहे.मात्र जो जीव गेला त्याचे काय?”असा प्रश्न रुपाली चाकणकर यांनी विचारला आहे.कोणतीही घटना घडताना ती एका दिवसात घडत नाही त्यामागे अनेक पडसाद उमटलेले असतात मात्र ज्या पीडित,तक्रारदार असतात त्यांना स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी जागा मिळत नाही.राज्य महिला आयोगाच्या वतीने सातत्याने गृहविभागाला आम्ही सूचना दिल्या आहेत की,पोलीस स्टेशनमध्ये सेल सक्षम करावे.काही पोलीस स्टेशन्समध्ये ते सक्षम आहेत तर काही ठिकाणी ते कागदावरच आहेत असेही चाकणकर यांनी म्हटले आहे.लिव्ह इन मध्ये राहणार्‍या प्रेयसीची हत्या करून तिच्या शरीराचे असंख्य तुकडे कऱणार्‍या मनोज सानेला १६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.त्याने हत्या का केली ते अद्याप स्पष्ट झाले नाही.सरस्वती वैद्यची त्याने आधी हत्या केली त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले हे तुकडे पोलिसांना घटनास्थळी मिळाले आहेत.सदरील तुकडे आता पोलिसांनी जेजे रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहे.हत्या करून ज्या प्रकारे त्याने मृतदेहाचे असंख्य तुकडे केले ते क्रौर्य अंगावर शहारे आणणारे आहे.मीरा रोडच्या गीत नगर मधील गीता दिप इमातीच्या ७ व्या मजल्यावर मनोज साने (५६) आणि सरस्वती वैद्य (३२) हे दोघे मागील ५ वर्षांपासून भाड्याच्या सदनिकेत रहात होते.बुधवारी संध्याकाळी त्याच्या घरातून दुर्गंधी येत असल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.मनोज साने याने सरस्वतीच्या मृतदेहाचे असंख्या तुकडे करून ते कुकर मध्ये शिजवत होता त्याला बुधवारीच अटक करण्यात आली व गुरूवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता साने याला १६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावाण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.