मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडिया अकाऊंटवरून जीवे मारण्याची धमकी आल्याचे समोर आले असून “तुमचाही लवकरच दाभोलकर होणार”,अशी धमकी शरद पवारांना देण्यात आली आहे तसेच त्या पोस्टमध्ये त्यांना शिवीगाळही करण्यात आली आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत.शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन रीतसर तक्रार दाखल केली आहे त्यावर आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करणार असल्याचे सांगितले आहे असे सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला.“मला व्हॉट्सअॅपवर आज हा मेसेज आला.एका वेबसाईटवरून अशी धमकी दिली जात आहे.त्या व्यक्तीच्या फॉलोअर्सच्याही काही कॉमेंट्स आल्या आहेत हे आक्षेपार्ह आहे. अशा धमक्या आल्या असतील तर गृहमंत्रालयाने याची नोंद घ्यावी.मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना यासंदर्भात माहिती दिली आहे.शरद पवारांना ज्या पद्धतीने ही धमकी आली आहे ते दुर्दैवी आहे असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणल्या.
राजकारणात मतभेद जरूर असतात परंतु इतका द्वेष आज समाजात पसरवला जात आहे.ही कसली संस्कृती आहे?ही दडपशाही आहे हे गुंडाराज नाही तर काय चाललय हे? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.या धमकीवर त्या अकाऊंटवर लोकांच्या आलेल्या कॉमेंट्स पाहा.या सगळ्या कॉमेंट्स कुठून येतात? हे द्वेषाचे राजकारण आहे.यावर महाराष्ट्र सरकारने कठोर कारवाई करावी अशी माझी सरकारकडे मागणी आहे.या सगळ्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर आणि गृहमंत्रालयावर आहे हे असे प्रकार म्हणजे घाणेरडे राजकारण आहे असे प्रकार थांबायला हवेत.शरद पवारांची सुरक्षा ही गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे.आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.बघुयात काय होतय”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.मी एक महिला म्हणून आणि एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या गृहमंत्र्यांना न्याय मागतेय जर काही झाले तर त्याला जबाबदार फक्त देशाचे आणि राज्याचे गृह मंत्रालय असेल”,असा इशाराच सुप्रिया सुळेंनी यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारला दिला आहे.