“मनोज साने एचआयव्ही संसर्गित,सरस्वती ही मनोज सानेला मामा अशी हाक मारत होती”-पोलीस तपासात धक्कादायक खुलासा
श्रद्धा वालकरच्या हत्याकांडापेक्षाही भयंकर हत्याकांड हे मीरा रोडमध्ये घडले आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केली त्यानंतर तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले.काही तुकडे शिजवले,काही भाजले तर काहींची विल्हेवाट लावली मात्र मनोज सानेला अटक करण्यात आली आहे.तसेच सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडेही जे.जे.रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत व या प्रकरणात मनोज सानेची चौकशी सुरु आहे.सरस्वती अनाथ होती तिने मनोज हा आपला मामा आहे आणि तो खूप श्रीमंत आहे अशी ओळख करुन दिली होती अशी माहिती अनाथ आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.सदरील निर्घृण हत्येनंतर सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले मात्र सरस्वती ही मनोजला भेटण्याआधी एका अनाथ आश्रमात राहात होती.आश्रमात काम करणाऱ्या अनु साळवे यांनी सांगितले की सरस्वती ही मनोज सानेला मामा अशी हाक मारत होती तसेच माझा मामा खूप पैसैवाला आहे श्रीमंत आहे असे तिने सांगितले होते.मनोज साने जेव्हा तिच्या आयुष्यात आला त्यानंतर ते दोघे कारने आश्रमात यायचे.सरस्वती तिच्यासह इतर मुलांसाठी जेवण,खाऊ आणि कपडे आणायची असेही साळवे यांनी सांगितले आहे.एनडीटीव्हीने याविषयीचे वृत्त दिले आहे.ती सुरुवातीला यायची तेव्हा ती खुश असायची मात्र दोन वर्षांपासून ती दुःखी होती जास्त कुणाशी बोलायची नाही.सरस्वती जेव्हा १८ वर्षांची झाली तेव्हा ती अनाथ आश्रमातून तिच्या बहिणीकडे गेली होती असेही अनु साळवे यांनी सांगितले आहे.