Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे.सौरभ पिंपळकर नावाच्या तरुणाने ट्विटरवरून शरद पवार यांना धमकी दिली आहे तेव्हापासून सौरभ पिंपळकरचा पोलीस शोध घेत आहेत.शहरातील साईनगर भागात राहणारा २६ वर्षीय सौरभ पिंपळकर हा भाजपाचा कार्यकर्ता आहे त्याच्या टि्वटर अकाउंटवर त्याने ‘आय ॲम बीजेपी ॲक्टिव्हिस्ट,आय हेट सेक्यूलेरिझम’असे लिहून ठेवले आहे.अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सौरभ पिंपळकरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गाडगेनगर पोलिसांचे पथक त्याच्या शोधात आहे हे पथक त्याच्या घरीही जाऊन आले परंतु तो आढळून आला नाही त्याचा मोबाईलदेखील बंद आहे.