यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातीत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या धुळेपाडा या आदीवासी वस्तीवर राहणाऱ्या नागरीकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी काल दि ९ जून शुक्रवार रोजी यावल येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्यावतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा प्रमुख सतिष वाडे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील भुसावळ टी पॉईंट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दरम्यान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी यावल पंचायत समितीच्या अंतर्गत होणाऱ्या गावपातळीवरील भोंगळ व दुर्लक्षित कारभाराचा पाडाच वाचला तसेच ग्रामिण पाणी पुरवठा विभागातील अधिकारी यांनी यावल तालुक्यातील बोरखेडा शिवारात आदिवासी समाज बांधवाकरिता शासनाच्या जल जिवन मिशन या योजनेअंतर्गत ट्युबेलच्या मंजुरीच्या मुळ कागदपत्राची चौकशी करण्यात यावी,ट्युबेलचे सुरु असलेले काम बंद करण्यात आल्याबद्दल त्याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच धुळेपाडा या गावामध्ये तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी या प्रमुख मागण्यांकरिता सदरील आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतिष वाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच तालुका अध्यक्ष विलास तायडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटवर सुमारे दोन तास करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे प्रमुख राज्य मार्गाची वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती.
यावेळी पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी आंदोलना ठीकाणी भेट देवुन संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करण्या संदर्भातील लिखितपत्र दिल्याने व तात्काळ धुळेपाडा गावात पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी असे आदेश दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांना धुळेपाडा पाणीप्रश्ना बाबतच्या मागण्याचे निवेदन पाठविण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.सदरील आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे,तालुका युवक अध्यक्ष सतिष अडकमोल,तालुका महिला मंच अध्यक्ष लक्ष्मीबाई मेढे, चोपडा तालुका महिला मंच अध्यक्षा अनिता बाविस्कर,यावल तालुका युवासेना अध्यक्ष तसलीम पठाण,राहुल भिलाला,अमोल तायडे,मिलिंद सोनवणे,मनिष भिलाला,दिपक मेढे यांनी परिश्रम घेतले तर या आंदोलनात शेकडो आदीवासी महिला व पुरुषासह कार्यकर्ते उपस्थित होते.