जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमएस)ऑर्गनायझेशन खान्देशतर्फे शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
आपल्याकडे उन्हाळ्यात नेहमीच रक्ताची तुटवडा जाणवत असतो व त्यातल्या त्यात उन्हाचा पारा चढता असल्याने नियमित रक्तदाते सुद्धा रक्तदान करण्यास टाळाटाळ करीत असतात त्यामुळे दिवसेंदिवस ब्लड बँकेतील कमी होणारा रक्तसाठा लक्षात घेऊन परदेशासह विविध ठीकाणी समाजसेवा करणारी छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशन आणि ट्रेड विथ जाझ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,जाणता राजा छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाचे सुवर्णयोगी दिनाचे औचित्य साधून “रक्तदान सर्वश्रेठ दान”हा उपक्रम राबून रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.या शिबिरास संपूर्ण जळगाव शहरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीएमएस छत्रपती मराठा साम्राज्य गृप या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संघटनेचे संचालक जितेंद्र पवार,उदयराम पाटील,दिपक चव्हाण,केतन पाटील,कैलास पाटील व ट्रेड विथ जाझचे मिलिंद पाटील,दुर्गेश पवार यांनी परिश्रम घेतले.