Just another WordPress site

चोपडा येथील पंकज समूहाच्या वतीने शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-

येथील शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात लक्षवेधी असे कार्य करणाऱ्या पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले.यानिमित्ताने कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रासाठी ‘शिक्षकांचे ओरिएंटेशन व शिक्षक व संस्था यांच्यातील एक्स्पेक्टेशन अलाइनमेंट’ या विषयावर शिक्षकांशी संवाद साधण्यात आला.यावेळी शिक्षण म्हणजे नेमके काय?शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रतीची भूमिका आणि कर्तव्य,टीचिंग लर्निंग प्रोसेस,विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच क्षमता ओळखून त्यांना नर्चरींग आणि डेव्हलपमेंट करण्याच्या बाबतीतला शिक्षकांचा दृष्टिकोन, ज्ञानरचनावाद व शासनाने येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरण,शिक्षणातील मूलभूत संकल्पना याविषयी शिक्षण तज्ञ मा.सोनम वांगचुक यांनी मार्गदर्शन केले.प्रसंगी ज्ञान व माहिती यातील फरक,शिक्षण संस्था व शिक्षक यांच्यातील अपेक्षांचे देवाण-घेवाण,शिक्षक म्हणून एका विशिष्ट जबाबदारीच्या पलीकडीला विचार व त्यासाठी आवश्यक असणारी कृती व या सर्व साधनांचा संयुक्तिक व सकारात्मक वापर केल्यानंतर शैक्षणिक व्यवस्थेत निर्माण होणारे पोषक वातावरण आणि याचा विद्यार्थ्यांना होणारा प्रत्यक्ष फायदा व गुणवत्ता विकास या सर्व बाबींविषयी  विविध उदाहरणांच्या माध्यमातून व सोप्या भाषेत सर्व उपस्थित शिक्षकांना समजून सांगण्यात आले.

या कार्यशाळेच्या मार्गदर्शन सत्राच्या शेवटी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ (पॉक्सो),RTE-२००९ कायदा या संदर्भात देखील मार्गदर्शन करण्यात आले व शिक्षकांच्या मनातील प्रश्न तसेच येणाऱ्या समस्या व यावर उपायोजना तसेच शंकांचे निरसन या बाबतीत देखील शिक्षक वृंदांशी संवाद साधण्यात आला.याप्रसंगी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश पंडित बोरोले तसेच संस्थेचे संचालक भैय्यासाहेब पंकज बोरोले,पंकज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.अत्तरदे,पंकज माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक व्ही.आर पाटील,पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.व्हि.पाटील,पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य मिलिंद पाटील आणि पंकज इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक केतन माळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

Leave A Reply

Your email address will not be published.