Just another WordPress site

महामार्ग दुरूस्ती मागणीसाठी मनसेचे यावल येथे रास्ता रोको आंदोलन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

गेल्या अनेक वर्षापासून गुजरात आणी मध्यप्रदेश अशा दोन राज्यांना जोडणारा बुऱ्हाणपुर ते अकलेश्वर या प्रमुख महामार्गावरील रस्ता असुन यावल ते चोपडा दरम्यान या मार्गावर सुमारे ३० ते ३५ किलोमिटर रस्त्याची अतिशय खराब व खडेमय अवस्था झाली आहे.सदर रस्त्याच्या मध्यभागी व ईतर ठीकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्डयांमुळे वाहनांचे अपघात होवुन यात अनेक निरपराध लोकांचे या अपघातात जीव गेलेले आहे असे असतांना देखील अनेक सामाजीक संघटनाच्या वारंवार तक्रारी देवुन देखील सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करून अद्यापपर्यंत हे रस्ते दुरुस्त केले नाही.अनेक वेळा निवेदने दिले तरी त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले त्या अनुशंघाने आज दि.१२ जून सोमवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रिक्षा व टॅक्सी चालक मिळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

दरम्यान राज्य महामार्गाचे अभियंता चंदन गायकवाड यांनी आठ दिवसात सदर रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असे लिखित आश्वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन थांबविण्यात आले असल्याची माहिती मनसेचे जनहित विभागाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले आहे.यावेळी राजेंद्र निकम उपजिल्हाध्यक्ष जळगाव,अजय तायडे उपजिल्हाध्यक्ष यावल, तालुका अध्यक्ष किशोर नन्नवरे,गौरव कोळी,विकास पाथरे,निलेश खैरनार,कुणाल बारी,निलेश तायडे,प्रमोद रुले,संजय शिंपी,पवन पवार यांच्यासह रिक्षा चालक व टॅक्सी चालक व नागरिक मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.