पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे.सागर बर्वे (वय 34) असे या आरोपीचे नाव आहे.सागर बर्वे हा आयटी इंजिनिअर असून त्याला मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे.