राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली होती.खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शरद पवारांनी दिली होती.त्यानंतर दि.१२ जून रोजी पक्षाच्या खजिनदारपदी खासदार सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शरद पवार यांनी सुनिल तटकरे यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले आहे.पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर सुनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यातच आता खजिनदार पदाचीही जबाबदारी सुनिल तटकरे यांच्यावर टाकली आहे.
सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्यावर शरद पवारांनी सांगितले की,सुप्रिया सुळे यांच्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी लोकांची मागणी होती.लोक आग्रहास्तव सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याकारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या खांद्यावर महाराष्ट्रासह,हरियाणा आणि पंजाब या राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये पक्षाची ताकद वाढावी म्हणून हा बदल करण्यात आला असून लोकांना परिवर्तन हवे आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे.