“आमच्याच पक्षाच्या विरोधात निवडणुका लढायच्या व आमच्याच मेळाव्यात न बोलावता यायचे हे कसे खपवून घेणार?”
भाजपा रामटेकचे माजी आमदार डी.मल्लिकार्जून रेड्डी यांच्या वक्तव्यावरून स्थानिक पातळीवरही युतीमध्ये असंतोष असल्याचे स्पष्ट
भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बाजूला करून शिवसेना वाढवण्यासारखा हा प्रकार नाही का?अडीच वर्षे हेच आमदार महाविकास आघाडीसोबत होते त्या काळात त्यांनी महामंडळावर स्वत:ची वर्णी लावून घेतली व भाजपाला विरोध केला आता मंत्रिपदासाठी ते भाजपासोबत आले आहे.खासदार कृपाल तुमाने यांनी रामटेक मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांना मदत केली नाही.मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यकर्ते गेले तर त्यांना निधी दिला नाही त्यांना फक्त भाजपाची मते हवी आहेत असे ते म्हणाले.विशेष म्हणजे व्यासपीठावर उपस्थित फडणवीस,बावनकुळे यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.राजकीय वर्तुळात सध्या रेड्डी यांच्या भाषणाची जोरदार चर्चा आहे.भाजपाच्या विरोधात निवडणुका लढवायच्या आणि पुन्हा आमच्याच पक्षाच्या नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसायचे हे आम्ही खपवून घेणार नाही,हवे तर मला पक्षातून काढून टाका अशा स्पष्ट शब्दात रेड्डी यांनी जयस्वाल यांच्या उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली.कृपाल तुमाने यांना निमंत्रणही नव्हते.आमच्याच पक्षाच्या विरोधात निवडणुका लढायच्या व आमच्याच मेळाव्यात न बोलावता यायचे हे कसे खपवून घेणार? असे भाजपा रामटेकचे माजी आमदार डी.मल्लिकार्जून रेड्डी यांनी म्हटले आहे.