Just another WordPress site

‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ ही जाहिरात म्हणजे शिंदे गटाचे दबाव तंत्र – राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे.या जाहिरातीला ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’असे शीर्षक देण्यात आले आहे.या जाहिरातीत शिंदे गटाने आगामी निवडणुकीसंदर्भातला एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे.या अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत तसेच अलिकडच्या काळात शिवसेना आणि भाजपात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रसिद्ध केलेली ही जाहिरात म्हणजे शिंदे गटाचे दबाव तंत्र असल्याचे बोलले जात आहे.या जाहिरातीत म्हटले आहे की,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.मतदान सर्वेक्षणानुसार भारतीय जनता पक्षाला ३०.२% आणि शिवसेनेला १६.२% जनतेने कौल दिला आहे म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४% जनता भाजपा आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.जाहिरातीत म्हटले आहे की,मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील २६.१% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना २३.२% जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे म्हणजेच महाराष्ट्रातील ४९.३ टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शवली असल्याचे म्हटले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजपा आणि शिंदे गटात मतभेद निर्माण झाले आहेत.एकीकडे या मतभेदाची पार्श्वभूमी आहे तर दुसऱ्या बाजूला सरकार स्थापन करून एक वर्ष उलटले तरी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा निर्णय अद्याप झालेला नाही.शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना भाजपाचा विरोध असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे ही जाहिरातबाजी म्हणजेच शिवसेनेचे दबावतंत्र असल्याचे बोलले जात आहे.२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ‘देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र’ अशी जाहिरात केली होती याच आशयाचा प्रचार केला जात होता परंतु आता राज्यात एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचा दावा केला जात आहे तसेच या जाहिरातीमधल्या दाव्यांनुसार राज्यात भाजपाला ३०.२% आणि शिवसेनेला १६.२% जनतेने दिला कौल दिला आहे याचाच अर्थ भाजपा आगामी निवडणूक शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय जिंकू शकत नाही असा संदेश शिंदे गटाला या जाहिरातीमधून द्यायचा असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.