Just another WordPress site

“एकनाथ शिंदेंची सेना ही मोदींच्या टाचेखालची सेना” – संजय राऊत यांची खरमरीत टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्यात वर्तमान पत्रांमध्ये आज एक जाहिरात देण्यात आली आहे ही जाहिरात एका सर्व्हेची आहे.राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असे शीर्षक या जाहिरातीला देण्यात आले आहे.या जाहिरातीत शिंदे गटाने आगामी निवडणुकीसंदर्भातला एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे.या अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत असे दाखवले गेले आहे.या सगळ्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.जाहिरात कुणाची आहे? ते बघावे लागेल.१०५ आमदारांचा पाठिंबा असलेल्या भाजपाने यावर उत्तर द्यायचे आहे.आम्ही काय बोलणार? एका सर्व्हेची जाहिरात कोट्यवधी रुपये खर्च करुन देण्यात आली आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे तसेच हा सर्व्हे नक्की कुठे केला? महाराष्ट्रातला हा सर्व्हे केला असेल असे वाटत नाही.मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांपुरता हा सर्व्हे असावा किंवा गुजरातमधला असावा.हा सर्व्हे खरा की खोटा यात आम्हाला पडायचा नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणणाऱ्यांनी मोदींचा फोटो जाहिरातीत दिला आहे मात्र बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. कोट्यवधींच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेखही नाही त्यामुळेच ही शिवसेना ही शिवसेना नसून मोदी शाह यांची सेना आहे हे स्पष्ट झाले आहे.रोज बाळासाहेबांच्या नावाने जी पोपटपंची सुरु आहे ना? त्यांचा मुखवटा उघडा पडला आहे.एकनाथ शिंदेंची सेना ही मोदींच्या टाचेखालची सेना आहे.अमित शाह यांची सेना आहे.बाकी सर्व्हेबाबत आम्ही काही बोलणार नाही.देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापैकी नेते उत्तर देतील.एकनाथ शिंदेंचा गट आणि भाजपा यांनी एकमेकांमध्ये कुस्ती खेळावी,मल्लखांब खेळावा,खोखो खेळावा आम्हाला काही घेणे देणे नाही.दोन हजारांच्या नोटांचे खोके बाहेर काढून हा खर्च झाला आहे का? असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.