Just another WordPress site

साकळी येथील खुल्या भुखंडावरील जलकुंभ बांधकाम थांबविण्याबाबत शिवसेनेतर्फे निवेदन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

तालुक्यातील साकळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गट क्रमांक सातमधील खुल्या भुखंडावर मंदीर पाडुन जिल्हा परिषदव्दारे मंजुर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा जलकुंभाचे बांधकाम त्वरीत थांबवावे अशी मागणी त्या परिसरातील राहणाऱ्या ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार निवेदनद्वारे केली आहे.सदरील काम न थांबल्यास शिवसेना (ठाकरे) गटाच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याबाबत साकळी गावातील रेखानगर या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी यावलच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड (बोरसे) आणी ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता पी.बी.देसले यांच्याकडे लिखित तक्रार दिली असुन या तक्रार निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,मौजे साकळी येथील ग्राम पंचायतच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गट क्रमांक सात या ठिकाणी रेखा नगर वस्ती असुन या ठिकाणी वस्तीत राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी विकासकाव्दारे धार्मिक विधी,विवाह कार्यक्रम आणी विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी ग्रामस्थांच्यासाठी त्यांचा हक्काचे खुले भुखंड ( ऑपन स्पेस ) सोडण्यात आले होते.दरम्यान साकळी ग्रामपंचायतीने या ठिकाणी राहणाऱ्या धारकांची कोणतीही संम्मती न घेता बेकायद्याशीर ठराव मंजुर करून पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ बांधण्याच्या तयारी केली असून बांधकाम करण्यास सुरुवातही केलेली आहे.या रेखा नगरच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या ग्रामस्थांची या जलकुंभाच्या कामास हरकत असुन पंचायत समिती प्रशासनाने व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तात्काळ हे जलकुंभाचे होणारे काम थांबवावे अशी तक्रार केली आहे.

सदरील निवेदनावर शांताराम माळी,अक्षय पाटील,प्रल्हाद वाघळे,अशोक महाजन,शामराव कोळी,नंदु माळी,किशोर शिरसाडे,जितेंद्र पाटील, अमीत कोळी,वसंत मराठे,ईश्वर लोधी,अशोक पाटील,किरण कोळी,सुपड्र महाजन,अर्जुन पाटील,मंगला महाजन,सतिष न्हावी,सुनिता शिरसाडे, निकीता माळी,संध्या सोनवणे,निलीमा महाजन,उषाबाई तेली,मनिषा न्हावी,ज्योती माळी,कमल सोनवणे,रंजना पाटील,रेखा चौधरी,सिमा महाजन,देवीदास पाटील आदींच्या स्वाक्षरी आहेत.यावेळी प्रशासनाने साकळीच्या नियोजीत जलकुंभाच्या ठिकाणी मंदीर असुन त्या मंदीरास तोडण्याचा प्रयत्न करण्यात येत असुन तसे झाल्यास शिवसेना सहन करणार नाही.तरी सदरील जलकुंभाचे बांधकाम त्वरीत थांबवावे अशी भुमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे यावल शहर उपप्रमुख संतोष खर्च,सारंगधर बेहेडे,पप्पु जोशी यांच्यासह रेखानगर येथील ग्रामस्थांनी मागणीला पाठींबा दिला आहे.या जलकुंभाचे बांधकाम करण्याचा प्रयत्न केल्यास लोकशाही मार्गाने मोठे आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.