Just another WordPress site

‘काळाबाजार रोखण्याकरिता’ कृषी केंद्रांची कृषी विभागामार्फत झाडाझडती

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी विभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध ठीकाणी कृषी केंद्रांची नुकतीच संपुर्ण तपासणी करण्यात आली.यावेळी पथकाने कुठल्याही परिस्थितीत लिंकिंग,जादा दराने विक्री,काळा बाजार होणार नाही याबाबत सक्त सूचना देऊन अनियमितता आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा तालुक्यातील कृषी केन्द्र धारकांना अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

खरीप हंगामात सर्व निविष्ठा शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीत विक्री व्हाव्यात यादृष्टीने विक्रेत्यांकडील साठा रजिस्टरची तपासणी करण्यात आली.प्रामुख्याने तालुक्यातील मोठ्या गावातील अधिकृत विक्रेत्यांच्या कृषी केंद्रांवर तपासणी करण्यात आली.शेतकऱ्यांनी निविष्ठा घेताना पक्के बिल घेणे,जादा दराने विक्री सुरू असल्यास कृषी विभागाला माहिती देण्याचे आवाहन केले.यानिमित्ताने यावल तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा सेवा केंद्रांची,कृषी निविष्ठा गोदामांची भरारी पथकाद्वारे तपासणी सुरू आहे.कृषी केंद्र तपासणी प्रसंगी भरारी पथकाचे तालुका कृषी अधिकारी अजय खैरनार,कृषी अधिकारी प्रकाश कोळी,पंचायत समिती कृषी अधिकारी धीरज हिवराळे,कृषी पर्यवेक्षक श्रीमती कंकाळ मॅडम आदी हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.