मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवर फक्त एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी या दोघांचाच फोटो होता.बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा फोटो नसल्याने विरोधकांनी शिंदे गटावर प्रहार केले होते तर आजच्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यासह शिवसेनेतील नऊ मंत्र्यांचे फोटो लावण्यात आले यावरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे आजचे डिझाईन दिल्लीवरून आले असावे असे त्या म्हणाल्या.‘राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून मोठा वादंग निर्माण झाल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्याकरता आज पुन्हा अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. ‘जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा’च्या जाहिरातीच्या माध्यमातून भाजपा-शिवसेना या डबल इंजिन सरकारच्या लोकप्रियतेचा पाढा वाचण्यात आला आहे एवढेच नव्हे तर लोकप्रियतेच्या बाबतीत विरोधकांना मिळालेली टक्केवारीही यातून देण्यात आली आहे.जनतेचा शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्त्वाला ४९.३ टक्के आशीर्वाद तर प्रमुख विरोधक २६.८ टक्के आणि अन्यांना २३.९ टक्के पसंती मिळाल्याचे या जाहिरातीत नमूद आहे.देशाच्या विकासाची दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला ८४ टक्के नागरिकांची पसंती;डबल इंजिन सरकारमुळेच राज्याच्या विकासाला गती येत असल्याचे ६२ टक्के नागरिकांचे मत;४६.४ नागरिकांची भाजपा-शिवसेनेला पसंती,प्रमुख विरोधक ३४.६ टक्के,अन्य १९ टक्के अशीही माहिती या जाहिरातीतून देण्यात आली आहे.