Just another WordPress site

पालघरमध्ये घर दाखवण्याच्या बहाण्याने २९ वर्षीय विवाहितेवर बलात्कार

पालघर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

पालघरमधल्या नालासोपारा या ठिकाणी घर दाखवण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.आकाश विठ्ठल सकपाळ असे बलात्कार करणाऱ्या इसमाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.आकाश सकपाळ आणि पीडित महिला हे नालासोपारा या ठिकाणी शेजारी राहतात तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.सदर महिलेचे लग्न झालेले असून ती तिच्या पतीसह आरोपीच्या घराशेजारी राहते.तीन वर्षांच्या ओळखीच्या फायदा घेत आकाशने पीडित महिलेला घर दाखवण्यासाठी नेले तिथे तिच्यावर एकाहून जास्तवेळा बलात्कार केला आणि तिचे अश्लील फोटोही काढले याबाबत कुठे काही बोलशील तर तुझ्या नवऱ्याला ठार करेन आणि तुझे फोटो व्हायरल करेन अशी धमकीही आकाशने तिला दिली होती आता पोलिसांनी आकाशला अटक केली आहे.ANI ने याविषयीचे वृत्त दिले आहे.

आरोपी आकाशने महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढले त्यानंतर तिच्या नवऱ्याला ठार करण्याची आणि तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली.पीडित महिलेने हा सगळा प्रकार आपल्या पतीला सांगितला त्यानंतर हे दोघेही पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी आकाशच्या विरोधात तक्रार दाखल केली.पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरुन गुन्हा नोंदवल्यानंतर आकाशला अटक करण्यात आली त्याला पोलिसांनी कोर्टात हजर केल्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.