“भाजपाचे व जनतेचे मन दुखावून किंवा स्वत:ची टिमकी वाजवून कल्याण होणार नाही”
शिंदे गटाच्या जाहिरात बाजीवरून भाजपा खासदाराचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवर प्रतिक्रिया देताना अनिल बोंडे म्हणाले की,खरे म्हणजे आपल्या विदर्भात एक म्हण आहे.बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती बनत नाही.एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत.भारतीय जनता पार्टीसह सर्व जनतेने त्यांना स्वीकारले आहे पण त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत असतील असे मला वाटत आहे कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाहीय.उद्धव ठाकरेंना वाटत होते की,मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे.आता एकनाथ शिंदेंना वाटायला लागले की ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे.पुढच्या काळात शिवसेनेला (शिंदे गट) वाटचाल करायची असेल तर भारतीय जनता पार्टीचे आणि जनतेचे मन दुखावून किंवा स्वत:ची टिमकी वाजवून कल्याण होणार नाही.विशेष म्हणजे “राष्ट्रामध्ये मोदी अन् महाराष्ट्रामध्ये शिंदे” ही जाहिरात मंगळवारी छापून आल्यानंतर शिंदे गटाने बुधवारी १४ जून रोजी नवीन जाहिरात प्रसिद्ध करत डॅमेज कन्ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.नवीन जाहिरातीत शिंदे गटाने देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फोटो लावले आहेत तसेच जाहिरातीतील मजकूराचा सूर युतीला समर्थन देणारा आहे.