गेल्या दोन दिवसांपासून लोकप्रियतेवरून शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीत कुरघोडी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत अशी जाहिरात कथित शिंदे गटाकडून दिली होती.“राष्ट्रामध्ये मोदी अन् महाराष्ट्रामध्ये शिंदे”असा मजकूरही या जाहिरातीत छापला होता.या जाहिरातीवरून शिंदे गट व भाजपामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे.भारतीय जनता पार्टीचे खासदार अनिल बोंडे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली.“बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती होत नाही.ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही अशा शब्दांत अनिल बोंडेनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडले होते.बोंडे यांच्या टीकेवर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.बेडूक फुगतो की सुजतो हे नंतर कळेल अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.अनिल बोंडेंच्या टीकेबद्दल विचारले असता भरत गोगावले म्हणाले,आता मगाशी माझी उपमुख्यमंत्र्यांबरोबर याबद्दल चर्चा झाली आहे त्यांनी तिथूनच त्या लोकांना फोन करून काय सांगायचे आहे ते सांगितले आहे त्यामुळे आता आम्ही त्या खोलात जास्त शिरत नाही.वरच्या स्तरावर याचा विचार केला जाईल बेडूक फुगतो की सुजतो हे नंतर कळेल असे त्यांनी म्हटले आहे.
शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवर प्रतिक्रिया देताना अनिल बोंडे म्हणाले,खरे म्हणजे आपल्या विदर्भात एक म्हण आहे.बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती बनत नाही.एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत.भारतीय जनता पार्टीसह सर्व जनतेने त्यांना स्वीकारले आहे पण त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत असतील असे मला वाटतय कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाहीये.उद्धव ठाकरेंना वाटत होते की मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे.आता एकनाथ शिंदेंना वाटायला लागले की,ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे.पुढच्या काळात शिवसेनेला (शिंदे गट) वाटचाल करायची असेल तर भारतीय जनता पार्टीचे आणि जनतेचे मन दुखावून किंवा स्वत:ची टिमकी वाजवून कल्याण होणार नाही असे अनिल बोंडे यांनी म्हटले होते.