Just another WordPress site

“मनोज साने ‘डेटिंग ॲप’वर अनेक मुलींच्या संपर्कात असल्याचे समजल्यामुळे झालेल्या भांडणातून सरस्वतीची हत्या” -पोलिसांचा मोठा खुलासा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
सरस्वती वैद्यची हत्या करणारा आरोपी मनोज साने डेटिंग ॲपवर अनेक मुलींच्या संपर्कात असल्याचे समजल्यामुळे सरस्वती आणि आरोपी साने यांच्यात भांडण झाले होते त्या भांडणातूनच सरस्वतीची हत्या करण्यात आली असावी असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. परंतु आरोपी सानेने सरस्वतीची हत्या नेमकी कशी केली? याचा तपास आता पोलीस करत आहेत.मनोज साने हा सेक्सच्या आहारी (सेक्स अॅडिक्ट) होता तो सतत अश्लील संकेतस्थळांवर सक्रीय होता असेही तपासात आढळले आहे.मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्या प्रकरणात आठवड्यानंतरही नवनवीन माहिती समोर येत आहे.मनोज साने ‘डेटिंग ॲप्स’वर सक्रिय होता आणि त्यातून तो अनेक मुलींच्या संपर्कात होता. हे समजल्यामुळेच सरस्वती आणि मनोज साने यांच्यात भांडण झाले होते या भांडणातूनच तिची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मनोज साने हा सेक्सच्या आहारी गेला होता तो सतत अश्लील संकेतस्थळांना भेटी देत असायचा त्याच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील छायाचित्रे जतन केल्याचेही आढळून आले आहे.सरस्वतीने आत्महत्या केल्याचा साने याचा दावा पोलिसांना मान्य नाही.मनोज साने यानेच तिची हत्या केली आहे मात्र नेमकी हत्या कशी केली याचा आम्ही तपास करत आहोत अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे.

 

सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी साने याने विद्युत करवत आणि चाकूचा वापर केला होता.हत्या केल्यानंतर त्याने चाकूला धार लावून आणली होती.मृतदेहाचे तुकडे करत असताना विद्युत करवतीची साखळी निघाली होती त्यामुळे ती त्याने दुरुस्तीला टाकली होती असे पोलिसांनी सांगितले आहे.सानेच्या घरातून पोलिसांनी कीटकनाशक जप्त केले आहे हे कीटकनाशक पाजून सरस्वतीची हत्या केली असावी का? याचा पोलीस तपास करत आहे.जे जे रुग्णालयातून मृतदेहाच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल अद्याप येणे बाकी आहेत.सरस्वती वैद्य एकाकी आयुष्य जगत होती.ती कुणाच्याच संपर्कात नसायची.ती साने व्यतिरिक्त कुणाला ओळखत नव्हती की तिला कुणी ओळखत नव्हते. तिच्या बहिणींना साने संपर्क करू देत नव्हता ती दिवसभर घरातच असायची.या काळात ती ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाली होती तिचा मोबाईल सानेच वापरायचा.मनोज सानेने त्याला एचआयव्हीची लागण असल्याचे तसेच तो नपुंसक असल्याचे पोलिसांना सांगितले होते त्याच्या या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी आज गुरुवारी त्याची पुन्हा वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.