Just another WordPress site

“शिंदे यांच्‍यावर टीका करण्‍याचे परिणाम भाजपाच्‍या नेत्‍यांना भोगावे लागतील”आमदार बच्‍चू कडू यांचा इशारा

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यावर टीका करण्‍याची भाजपाचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांची लायकी नाही त्‍यांनी आधी आपली लायकी ओळखली पाहिजे.डॉ.अनिल बोंडेंनी बेडकाची उपमा देऊन मुख्‍यमंत्र्यांवर टीका केली त्‍याचा आम्‍ही निषेध करतो.बेडूक कोण हे येणारा काळ ठरवेल भाजपच्‍या नेत्‍यांनी अशा प्रकारची वक्‍तव्‍ये करणे टाळावे अन्‍यथा आम्‍ही योग्‍य उत्‍तर देऊ असा इशारा प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू यांनी दिला आहे.भाजपाचे राज्‍यसभा सदस्‍य डॉ.अनिल बोंडे यांनी बुधवारी वाशिम येथे प्रसार माध्‍यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्‍यावर टीका केली होती त्‍याचे तीव्र पडसाद शिंदे गटात उमटले आहेत.शिंदे यांचे समर्थक असलेले बच्‍चू कडू देखील आता मैदानात उतरले आहेत.
प्रसार माध्‍यमांशी बोलताना बच्‍चू कडू म्‍हणाले की,एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर भाजपाच्‍या आमदारांना मंत्री म्‍हणून काम करण्‍याची संधी मिळाली नसती हे आधी भाजपाच्‍या नेत्‍यांनी लक्षात घेतले पाहिजे.अजूनही काहीच सांगता येत नाही.डॉ.अनिल बोंडे यांनी एकनाथ शिंदे यांच्‍यावर टीका करून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून घेतला आहे त्‍यांनी मुख्‍यमंत्र्यांची माफी मागितली पाहिजे.शिंदे यांच्‍यावर टीका करण्‍याचे परिणाम भाजपाच्‍या नेत्‍यांना भोगावे लागतील,शिंदे यांनी बाहेर पडण्‍याची भूमिका घेतली नसती तर भाजपा फुगले नसते अशीही टीका बच्‍चू कडू यांनी केली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.