“५० आमदारांच्या योगदानामुळे आपण सत्तेत आहोत याचा भाजपाला विसर” बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर
एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह शिवसेनेत केलेल्या बंडखोरीला २० जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले लवकरच शिंदे-भाजपा सरकारचीही वर्षपूर्ती होईल पण अद्यापही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही त्यामुळे अनेक आमदारांनी वेळोवेळो नाराजी व्यक्त केली आहे.अशातच प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी शिंदे-भाजपा सरकारला घरचा आहेर दिला आहे.“मंत्रिमंडळ विस्तार करण्याची क्षमता सरकारमध्ये नाही,” असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.एकनाथ शिंदे यांनी चांगले निर्णय घेतले आहेत यात दिव्यांग मंत्रालय,शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले तसेच शेतकऱ्यांना पहिल्यांदा २ हजार कोटी नंतर १५०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे.१५ ते २० वर्षाच्या काळात नुकसान भरपाईची सर्वात जास्त मदत या सरकारच्या काळात दिली आहे असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
५० आमदारांची गळचेपी झाली आहे विरोधक खोके घेतले म्हणून सांगतात.भाजपाकडून आमदारांना त्रासही होत आहे.रवी राणांनी माझ्यावर खोके घेतले म्हणून आरोप केला.५० आमदारांच्या योगदानामुळे आपण सत्तेत आहोत याचा विसर भाजपाला पडल्याचे जाणवत आहे. भाजपाच्या मंत्र्यांकडून काम थांबवली जातात ते झाले नाही पाहिजे कारण सर्वांना सन्मान देणे गरजेच आहे.मंत्रिमंडळ विस्ताराला एक वर्ष लागणार नाही असे वाटत होते पण अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही ते दुर्दैवी असले तरी काही काम चांगली झाल्याने मंत्री केले म्हणून नाराज नाही मी नेहमी सांगतो मंत्रिमंडळ विस्तार २०२४ नंतरच होणार आहे.ती क्षमता सध्या सरकारमध्ये नाही असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.