यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत एकनाथ चौधरी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.माजी अध्यक्ष कै. डॉ.सतीश सुपडू यावलकर यांचे दि.१२ एप्रिल २०२३ रोजी निधन झाले होते त्यामुळे त्यांच्या निधनानंतर बँकेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेवर काल दि.२१ जून २०२३ रोजी झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत अट्रावल तालुका यावल येथील प्रगतीशील शेतकरी हेमंत एकनाथ चौधरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
बँकेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक जे.बी.बारी हे होते.यावेळी सर्व संचालक मंडळ सदस्य व सीईओ उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यावल सहाय्यक निबंधक जे.बी.बारी यांनी काम पाहिले.प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष हेमंत एकनाथ चौधरी यांनी यावेळी सर्व संचालक व कर्मचारी यांच्या सोबत राहुन सर्वांच्या सहकार्याने बँकेला प्रगती पथावर नेण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.