कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वनकर्मचाऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध
जळगाव-पोलिसनायक (जिल्हा प्रतिनिधी) :- यावल पुर्व वनक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांवर दि.१७ऑगस्ट २२ रोजी डोंगर कठोरा पयझिरी कंम्पारमेंट नंबर ८०मध्ये अधिकारी व वनकर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आरोपींना जंगलामध्ये कर्तव्यावर असतांना झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात संशयित आरोपींवर भारतीय दंड संहिता १८६०कलम ३५३नुसार गुन्हा दाखल करून कठोर शासन व्हावे याबाबत आज दि.२२रोजी मा.जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांना कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.याप्रसंगी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र.जी.तायडे,सहसचिव योगेश अडकमोल,वन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास सोनवणे,कास्ट्राईब संघटनेचे सचिव योगेश सोनवणे,सहसचिव योगीराज तेली,गोवर्धन डोंगरे,कृष्णा शेळके,जितेंद्र मोरे,राकेश निकुंबे,श्रीमती कमल ठेपले,प्रमिला मराठे,कोषागार मीनाक्षी सोनवणे,रवींद्र गायकवाड,महेश जाधव आदी.कर्मचारी उपस्थित होते.