यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील किनगाव येथील एका व्यापाऱ्याची एका व्यक्तिने विश्वास संपादन करून खोटे धनादेश देत सुमारे दोन लाख रूपयांच्यावर फसवणुक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती अशी की,तालुक्यातील किनगाव येथील रहिवाशी भुषण नंदन पाटील वय ३३ वर्ष यांचे राधाकृष्ण ट्रेडींगचे दुकान असुन दि.१७ जून २३ ते २२ जून २३ या कालावधी दरम्यान दुपारी ४ वाजेच्या सुमारास किनगाव बु॥ गावातील संशयीत आरोपी आरीफ खान ईसा खान राहणार विवरे तालुका रावेर आणी फोनवर आदीवासी शाळेतील शिक्षक म्हणुन बोलणाऱ्या व्यक्तिच्या दिलेल्या धनादेशावर विश्वास ठेवुन ९१ हजार रूपये किमतीची आसारी,६५ हजार रुपये किमतीचे ३०पत्रे,५० सिमेंटच्या गोण्या,६१हजार रूपये किमतीची आसारी यांच्यासह बांधकामास लागणारे सुमारे २ लाख २५हजार रुपये किमतीचे साहीत्य सामान दिला.यात संशयीत आरोपी यांनी भुषण पाटील यांची फसवणुक केल्याचे निर्दशनास आल्याने त्यांनी यावल पोलीस ठाण्यात विश्वास संपादीत करून संबधीत बांधकाम साहीत्य खरेदी करणाऱ्यांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच संशयीत आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नरेन्द्र बागुले हे करीत आहे.