महाराष्ट्रात १९९९ मध्ये उत्तर प्रदेशचा पक्ष आला हैदराबादचाही आला असे किती आले आणि गेले.आता परत हैदराबादचा पक्ष येतोय त्याने महाराष्ट्राला काहीच फरक पडणार नाही.महाराष्ट्रातील जनता या अशा प्रलोभनांना बळी पडणार नाही.गुजरात पॅटर्न,तेलंगना पॅटर्नही लोकांना माहितेय.तेलंगना काही आपल्यापासून दूर नाहीय.तेलंगनाचा शेतकरी किती अडचणीत आहे,सामाजिक व्यवस्थेत किती बिघाड आहेत हे माहितेय असे नाना पटोले म्हणाले.शाहु,फुले,आंबेडकरांचा विचार काँग्रेस जोपासत आहे.गेल्या ६० वर्षांत काय केले तर शाहु,फुले, आंबेडकरांच्या जोपासले म्हणून चाय विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकला ही काँग्रेसचीच देन आहे असेही नाना पटोले म्हणाले.प्रत्येक राज्यातील भाजपाविरोधातील पक्षांची आज पाटण्यात सभा आहे.भाजपाविरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी,तीव्र चीड आहे.२०१४, २०१९ मधील आश्वासनांची पूर्तता झालेली नाही.देश विकून देश चालवत आहेत.देशातील संवैधानिक व्यवस्था संपवत आहेत अशा परिस्थितीत भाजपा ही व्यवस्था लोकशाही व्यवस्थेमध्ये नसली पाहिजे यासाठी पाटण्यात विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आहे असेही नाना पटोले म्हणाले.