Just another WordPress site

रावेर येथे विविध मागण्यांकरिता निळे निशान संघटनेतर्फे जनआक्रोश आंदोलन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीष वाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर नुकतेच जनआंदोलन करण्यात आले.

सदरील आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावातील अक्षय भालेराव या तरुणांच्या मारेकऱ्याना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच तालुक्यातील विविध नागरी समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील छोरिया मार्केट ते तहसिलदार कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढून जनआंदोलन करण्यात आले.या आंदोलनात तालुक्यातील बेघर भूमिहीनांच्या समस्या सोडवून अनुसुचित जाती जमाती वस्त्या पाड्यावर तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी,जलजिवन मिशन अंतर्गत रावेर तालुक्यातील झालेल्या कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी,भुसावळ औष्णीक विद्युत केंद्रासह जिल्ह्यातील सर्व कंपनीमध्ये स्थानिक सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा,जिल्ह्यातील सर्व हायस्कुल कॉलेजमध्ये मुलींच्या सुरक्षेकरिता निर्भया पथक कार्यान्वीत करण्यात यावे,शिक्षणाचे बाजारीकरण करून विद्यार्थि व पालक यांच्याकडुन फिच्या नावाने मनमानी पैसे वसुल करणाऱ्या संस्था चालकावर कारवाई करण्यात यावी,नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावात जातीय द्वेषातून अक्षय भालेराव याची निघृण हत्या करण्यात आली त्यामुळे अक्षय भालेराव याच्या कुटुंबावर मोठा अन्याय झालेला आहे तरी अक्षय भालेराव याच्या मारेकर्‍याना फाशीची शिक्षा देऊन अक्षय भालेराव याच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी व त्याच्या कुटुंबातील एकास शासकीय नोकरीतसमाविष्ट करून घ्यावे,जिल्हातील सन २०११ पुर्वीचे अतिक्रमित घरे नियमाकुल करावे,रावेर तालुक्यातील उदळी खु॥ गावाजवळ पाटबंधारे विभागाच्या जागेवर अनेक वर्षापासून असलेल्या २८ घराच्यां पुर्नवसन करिता निधी मंजूर असताना जाणीपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या ग्राम पंचायतीवर कारवाई करून पुर्नवसन प्रक्रियेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, रावेर तालुक्यातील विवरा बु ॥ , निभोंरा बु ॥ , निबोंल या गावातील मंजूर असलेल्या प्लॉटी तात्काळ वाटप करण्यात यावे अश्या अनेक समस्या सोडविणाच्या मागणीकरिता सदरील जनआक्रोश आंदोलन संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.२३ जून रोजी संघटनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत काढण्यात आला.

सदरील आंदोलनात जिल्हा प्रमुख सतिष वाडे, जिल्हा कार्याध्यक्ष सदाशिव निकम,फैजपुर विभागिय युवासेना अध्यक्ष सागर बाविस्कर,यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे,रावेर तालुका वाहतूक शाखा अध्यक्ष शरद तायडे,चोपडा तालुका महिला मंच अध्यक्ष अनिता बाविस्कर,रावेर तालुका महिला मंच अध्यक्षा विद्या बाविस्कर,यावल तालुका महिला मंच अध्यक्ष लक्ष्मी मेढे,चंद्रकांत सोनवणे,अनिल वाघ,वासुदेव महाजन, अश्विनी अटकाळे,कविता शिंदे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.