यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील आमोदे ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी पदी गौतम आधार वाडे यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे.गौतम वाडे यांनी सदरील पदाचा पदभार स्विकारल्यामुळे मागील एक वर्षापासुन नागरीकांच्या प्रलंबीत कामांना गती मिळणार असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
येथे मागिल एक वर्षापासुन नियमीत ग्रामविकास अधिकारी नसल्याने येथील कामाचा अतिरिक्त प्रभारी कारभार ग्रामविकास अधिकारी डी.डी. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता.नुकताच गौतम वाडे यांनी पदभार स्विकारल्याने आमोदे ग्रामपंचायतीचे प्रभारीराज संपले असुन आहे असे गावकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.सदरहू या ठीकाणी ग्रामविकास अधिकारी यांच्या रिक्त जागेवर वराडसिम तालुका भुसावळ येथुन गौतम वाडे यांच्या विनंती बदली वरून यावल पंचायत समितीत आले आहेत.ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे यांनी यापुर्वी यावल तालुक्यातील न्हावी,हिंगोणा,मारूळ,शिरसाड,साकळी याशिवाय वाघोदा तालुका रावेर आणी भुसावळ तालुक्यातील साकेगाव व वराडसिम या ठीकाणी त्यांनी मागील २५ वर्षात पारदर्शी सेवा दिलेली आहे.गावाच्या सर्वांगीण विकासासह स्वच्छता,पाणीपुरवठा आणी नागरींच्या मुलभुत सुविधा व समस्यांना अधिक प्राधान्य देणारे एक उत्कृष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणुन गौतम वाडे यांची ओळख असुन त्यांच्या २५ वर्षाच्या अनुभवी सेवा कालखंडाचा आमोदे गावास फायदा होईल अशी अपेक्षा आमोदे सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.