Just another WordPress site

अमरावती येथून वारकऱ्यांसाठीच्या विशेष रेल्वेला खा.नवनीत राणा यांनी हिरवी झेंडी दाखवून केले रवाना

गोपाल शर्मा,पोलीस नायक

अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

“प्रभू विठ्ठलाच्या दर्शनाची आस,सुखाचा होवो आपला प्रवास” या उक्तीनुसार आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वेला खासदार नवनीत रवी राणा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून काल दि.२५ जून रोजी रवाना करण्यात आली.यानिमित्त येथील स्थानिक अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावर ‘भरला वारकऱ्यांचा मेळा,जय हरी विठ्ठल,पांडुरंग हरी’च्या गजरात हजारो भाविक पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत.यावेळी आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांच्या हस्ते युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने वारकरी भाविकांसाठी साबुदाणा खिचडी,केळी व पाणी बॉटल यांचे वाटपही करण्यात आले.

सदरील रेल्वे गाडीत ११ स्लीपर,२ एसी टू टायर,२ एसी ३ टायर आणि ४ जनरल असे २२ डब्बे असून या गाडीत हजारो प्रवासी काल दि.२५ जून रविवार रोजी दुपारी या गाडीने पंढरपूरला रवाना झाले.यावेळी खासदार नवनीत राणा यांनी प्रत्येक वारकरी बंधू भगिनींची आस्थेने विचारपूस करून प्रत्येक वारकऱ्यांच्या चरणी स्पर्श केला तसेच येणारा हंगाम हा शेतकऱ्यांना सुख समृध्दी व भरभराटीचा जावो अशी प्रार्थना आपल्या वतीने विट्ठलाचरणी करण्याची विनंती केली.आपला धर्म हाच आपला श्वास असून धर्मरक्षण व धर्मप्रसारासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन यावेळी खासदार नवनीत राणा यांनी केले.प्रसंगी खासदार नवनीत राणा यांनी इंजिन चालक बी.के.पाल,एएलपी वाय.एस.लंगोटे,गार्ड अजित कुमार यांचा शाल,श्रीफळ व हार घालून सत्कार केला.यावेळी स्टेशन मास्टर श्री.लोहकरे,सीसीआय डी.के.मीना,स्वास्थ निरीक्षक अरविंद गुप्ता,संजय वर्मा,एस.पी.कुऱ्हाडे,राहुल जांगडे,युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितु दुधाने,झेडआर यू सी सी सदस्य अजय जयस्वाल, आफताब भाई,महिला शहर अध्यक्ष सुमती ढोके,आशिष गावंडे,नितीन बोरकर,सचिन भेंडे,अविनाश काळे,पराग चिमोटे,विनोद गुहे,साक्षी उमक,उषा प्रधान,कांचन कडू,वनिता तंतरपाले,निता खडसे,प्रतिभा महाजन,सारिका अवघड,पल्लवी गोस्वामी,नंदा सावदे,बाळासाहेब इंगोले, शहजादभाई,वैभव वानखडे,जयंत देशमुख,सूरज मिश्रा,खूष उपाध्याय,राहुल काळे,सचिन सोनोणे,मंगेश कोकाटे,वर्षाताई पकडे,खुशाल गोंडाने,खूरसूडे ताई,राजेश दातखोरे,दीपक जलतारे,आनंद पाठक,जयंत देशमुख,उषा प्रधान,माला खुळसुळे,लताजी अंबुलकर,महेश किल्लेकर,नंदा सावदे, संजय गायकवाड,अनुप खडसे यांच्यासह युवा स्वाभिमान पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.